झोपडपट्टीधारकांवरून शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने Shiv Sena Vs NCP on slum areas

झोपडपट्टीधारकांवरून शिवसेना- राष्ट्रवादी आमने सामने

झोपडपट्टीधारकांवरून शिवसेना- राष्ट्रवादी आमने सामने
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधल्या हजारो झोपडपट्टीधारकांना बेघर होण्याची वेळ आलीय. कित्येक वर्ष महात्मा फुले नगरमध्ये राहणा-या नागरिकांना झोपड्या रिकाम्या करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दबाव आणत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे.

पिंपरी चिंचवड मधली ही महात्मा फुले झोपडपट्टी..... या ठिकाणी तब्बल बाराशे हून अधिक झोपडपट्टीधारक राहतात. पण अचानक एमआयडीसीच्या ताब्यात असलेली ही जागा रिकामी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात. ७० ते ८० कोटी किंमत असलेल्या या भूखंडावर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा डोळा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

झोपडपट्टी रिकामी करण्याच्या नोटीसा मिळाल्यानं हजारो लोक बेघर होण्याची चिन्हं आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा काय प्रयत्न केला जाणार, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. येत्या काही दिवसांत हा मुद्दा आणखी चिघळणार, अशीच चिन्हं आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 25, 2013, 18:43


comments powered by Disqus