Last Updated: Sunday, December 1, 2013, 17:23
www.24taas.com, झी मीडिया, पुणे सीमा भागात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध शिवसेनेनं केला आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या विरोधात शिवसैनिकांनी निदर्शनं केली.
पुण्यातील कन्नड संघानं कर्नाटकचे मंत्री उमाश्री यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. वीरप्पा मोईली देखील या कार्यक्रमाला आले होते.
सीमा भागात मराठी बांधवांवर अत्याचार होत असताना, कन्नड संघानं मंत्र्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी वीरप्पा मोईली यांच्या समोर निदर्शनं केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 1, 2013, 17:23