पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, Shivsena MLA faces court problem

पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
www.24taas.com, पुणे

पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. पुण्यातल्या कामगार नेत्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार अरविंद सावंत यांना कोर्टानं सहआरोपी केलंय.

2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्या घरावर हल्ला झाला होता. पोलिसांनी काही आरोपींना अटक केलं होतं.

या आरोपींच्या जबाबावरुन शिवाजीनगर कोर्टानं अरविंद सावंत यांना सहआरोपी केलय. शिवाय त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणामुळं पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय.

First Published: Monday, October 22, 2012, 13:29


comments powered by Disqus