औरंगाबाद महापालिकेवर भगवा फडकला Shivsena`s mayor in Aurangabad

औरंगाबादमध्ये युतीने गड राखला

औरंगाबादमध्ये युतीने गड राखला
www.24taas.com, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या आज झालेल्या निवडणुकीत अखेर शिवसेनेच्याच महापौर बसणार आहेत. युतीच्या उमेदवर कला ओझा यांनी आघाडीच्या फिरदौस फातिमा यांचा पराभव केला. ओझा यांना ५९ मते मिळाली. ओझा या औरंगाबादच्या १९व्या महापौर ठरल्या आहेत. तसंच उपमहापौरपदी भाजपाचे संजय जोशी यांची निवड झाली आहे. निवडणूकीत गोंधळ होऊ नये म्हणून सभागृहातील बाकावरील लोखंडी माईक काढून घेण्यात आले. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडीनं ऐनवेळी उमेवार बदलला होता. कविता जाधव यांच्याऐवजी फिरदौस फातिमा यांना उमेदवारी दिली.

महापौर आणि उपमहापौरपदाची आज निवडणूक झाली. महापौरपदासाठी सहा तर उपमहापौरपदासाठी 12 उमेदवार रिंगणात होती. मुख्य लढत मात्र य़ुती विरोधात आघाडी अशीच होती. शिवसेनेकडून कला ओझा रिंगणात होत्या.

तर उपमहापौरपदासाठी युतीकडून भाजपचे संजय जोशी तर भाजपचे निलंबित नगरसेवक राजू शिंदे यांनी आघाडीच्या पाठिंब्यावर उपमहापौरपदाचा अर्ज भरला होता. जिल्हा परिषदेप्रमाणे महापालिकेतही शिवसेना भाजपला धक्का देण्याचा आघाडीचा प्रयत्न होता.


First Published: Monday, October 29, 2012, 12:32


comments powered by Disqus