महाब(र्फा)ळेश्वर! Snow at Mahabaleshwar

महाब(र्फा)ळेश्वर!

महाब(र्फा)ळेश्वर!
www.24taas.com, महाबळेश्वर

हिमवर्षावाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांना आता काश्मीरला जाण्याची गरज नाही. हा अनुभव महाबळेश्वरमध्येही सध्या घेता येत आहे. महाबळेश्वरही सध्या बर्फाच्या दुलईने वेढू लागलंय.

महाबळेश्वरमध्ये सध्या तापमानाचा पारा खूपच खाली गेल्यानं वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठून हिमकण तयार झालेत. त्यामुळं या परिसरात बर्फवृष्टी पसरल्याचं दिसतंय. हिमकणांच्या शाली पांघरलेल्या हा परिसर पांढराशुभ्र दिसून येतोय. हिमकणांमुळं वेण्णालेक बोट क्लबची जेट्टी तसंच लेक ते लिंगमळा परिसरातल्या एक किलोमीटर परिसरात हे चित्र दिसून येतंय.

स्ट्रॉबेरीचे मळे तर हिमकणांनी आच्छादून गेलेत. जमिनीमधील असलेल्या ओलाव्यामुळं तापमान दवबिंदू गोठण्यास पोषक होते. यामुळे दवबिंदू गोठून सर्वत्र बर्फ तयार झाला आहे. पर्यटकांना महाबळेश्वरमध्येच त्यामुळे बर्फाची मजा लुटता येत आहे.

First Published: Tuesday, January 8, 2013, 18:55


comments powered by Disqus