सोलापूर पालिका आयुक्त गुडेवार कामावर रूजू होणार solapur commissioner gudewar coming on work

सोलापूर पालिका आयुक्त गुडेवार कामावर रूजू होणार

सोलापूर पालिका आयुक्त गुडेवार कामावर रूजू होणार
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार उद्या पुन्हा कामावर रूजू होणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केल्यानंतर गुडेवार यांनी पुन्हा कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतला आहे.

अकरा लाख सोलापूरकर आपल्या पाठीशी असल्याचं यावेळी गुडेवार यांनी सांगितलं, लोकाभिमुख शासन चालवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचंही यावेळी चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितलं.

सोलापूरकरांच्या प्रेमाने भारावून गेलो असल्याचंही यावेळी गुडेवार यांनी सांगितलं. गुडेवार यांनी राजकीय दबावामुळे आयुक्त पदाचा राजीनामा दिला होता, अशी चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 13:38


comments powered by Disqus