Last Updated: Friday, October 19, 2012, 12:24
www.24taas.com, सोलापूरसोलापूर-गुलबर्गा या पॅसेंजरला लागलेली आग ही काही तांत्रिक कारणामुळे लागली नव्हती तर ती लावण्यात आली होती. गुलबर्गामधील एक प्रेमीयुगुल पळून जाण्याच्या बेतात असल्याने या ट्रेनच्या बोगीला आग लावून पेटविण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न उघडकीस आला आहे.
बोगीमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेल्या दोघांची ओळख पटली असून, ते प्रेमी युगुल गुलबर्गा येथील असल्याचे समोर आले आहे. गुलबर्गा स्थानकावर मंगळवारी दुपारी सोलापूर-गुलबर्गा पॅसेंजरला अचानक आग लागून दोन जण ठार तर 7 जण जखमी झाले होते. ही आग घातपाताचा प्रकार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले होते. चौकशी अधिकार्यांनी बुधवारी दोन जणांच्या हत्येसाठीच बोगी पेटवल्याचा संशय व्यक्त केला होता.
दरम्यान, गुरुवारी सकाळी गुलबर्गा लोहमार्ग पोलिसात एका मुलीचे पालक दाखल झाले. मंगळवारी घडलेल्या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी दोन दिवसांपासून आपली मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. तिचा फोटोही दाखवला. त्यानंतर हा सारा प्रकार बाहेर आला
First Published: Friday, October 19, 2012, 11:59