मर्सिडीजपेक्षा घोडी महाग, Solapur horse markets

मर्सिडीजपेक्षा घोडी महाग

मर्सिडीजपेक्षा घोडी महाग
www.24taas.com,सोलापूर

मर्सिडीज घ्यायची तर बाजार गेला तर २० ते २५ लाखांचा चुराडा ठरलेलाच असतो. पण अकलूजच्या घोडेबाजारात एका घोडीला तब्बल ३० लाखांची बोली लागली आहे. त्यामुळे मर्सिडीज घोडा महाग असीच स्थिती येथे दिसून आली.

सोलापुरातील अकलूजमध्ये घोडेबाजार भरला होता. या बाजारात तब्बल दोन हजाराच्या आसपास घोडे खरेदी-विक्रीसाठी आणले होते. परराज्यातून आलेल्या ग्राहकांना योग्य घोड्याची निवड करण्यासाठी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने घोड्यांची स्पर्धाही घेण्यात आली.

काकासाहेब माने-पाटील यांच्या मालकीच्या घोडीला ३० लाखांची बोली लागली. ही घोडी पंचकलपान मारवाड जातीची असून यंदाच्या अकलूज घोडेबाजाराचे ते एक मुख्य आकर्षण आहे. सुमारे साडेपाच लाखापासून १० ते १२ लाखांपर्यंतचे घोडे आहेत. आंध्र कर्नाटकसह देशभरातून घोडेशौकीन या बाजारात येत असतात. यावर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, कश्मीरमधून व्यापारी आपले घोडे या बाजारात घेऊन आलेत.

गेल्या चार वर्षांपासून सोलापूरातील अकलूजमध्ये घोडे बाजार भरतोय. या घोडेबाजारात घोडे खरेदी करण्यासाठी परराज्यातून खरेदीदार सोलापूरात दाखल झाले आहेत. या खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने घोड्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेत घोड्यांच्या रूबाबात चालण्याच्या स्पर्धा,नाचण्याच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. घोड्यांचा हा देखणा नाच पाहून खरेदीदार खूष झाले.

या आगळ्या-वेगळ्या घोड्यांच्या स्पर्धेत करमाळ्याच्या पृथ्वीराज पाटील या घोड्यानं अव्वल स्थान पटकावलंय. तर, देखण्या नाचात साता-याच्या खटाव तालुक्यातील पोपट मदने या घोड्यानं पहिला नंबर पटकावला. स्पर्धेच्या माध्यमातून ग्राहकांना घोडे खरेदीसाठी नक्कीच मदत झाली आहे.

First Published: Monday, November 26, 2012, 15:44


comments powered by Disqus