Last Updated: Tuesday, October 1, 2013, 12:24
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूरसोलापूर महानगरपालिकेनं ५०० पोलिसांच्या मदतीनं शहरातल्या अवैध डिजिटल होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात केलीय. ही मोहीम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली.
शहरातल्या महत्वाच्या विविध चौकातल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांचे होर्डिंग काढण्यास सुरुवात केली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी तीन एसीपी, ६ पोलीस निरीक्षक आणि ५०० पोलिसांचा ताफा ठेवण्यात आलाय.
शहरातल्या सर्व अवैध डिजिटल काढून सुंदर सोलापूर बनविण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सुरू केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 1, 2013, 12:12