तिहेरी हत्याकांड : कुटुंबप्रमुखाला अटक, Pune, son arrested in murder case

तिहेरी हत्याकांड : कुटुंबप्रमुखाला अटक

तिहेरी हत्याकांड : कुटुंबप्रमुखाला अटक
www.24taas.com, पुणे

वानवडी येथील तिहेरी हत्याकांडानं पुणे हादरले होते. दोन महिला आणि एका लहान मुलीची हत्या करण्यात आली होती. या खूनाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कुटुंबप्रमुख विश्वजीत मसलकर याला पोलिसांनी अटक केली. त्याने विवाहबाह्य संबंधातून हे हत्याकांड केल्याचे पोलिसांचा संशय आहे.

४ ऑक्टोबरला वानवडी परिसरातील उदयबागमध्ये तिहेरी हत्याकांडाची ही घटना घडली होती. चंपारत्ना सोसायटीमध्ये विश्वजीत मसलकर याचे कुटुंबीय राहत होते. विश्वजीत मसलकर हे नोकरीवरून रात्री आठच्या सुमारास परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांची आई शोभा, पत्नी अर्चना आणि दोन वर्षाची मुलगी किमया यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्यांना आढळलं, असा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासात वेगळीच माहिती पुढे आली. विवाहबाह्य संबंधातून कुटुंबप्रमुख विश्वजीतने हे हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या अपहरण, खून, दरोड्यांच्या घटनामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. उच्चभ्रू समजल्या जाणा-या पुण्यातल्या बी.टी. कवडे रोड परिसरातील पंचरत्न सोसायटीमध्ये गुरुवारी दुपारी हे हत्याकांड घडलं. तळ मजल्यावर राहणा-या ५० वर्षीय शोभा मसलकर, त्यांची २५ वर्षीय सून अर्चना आणि दीड वर्षे वयाची नात किमया या तिघींची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. शोभा यांचा मुलगा विश्वजित एका कंपनीत नोकरीला आहे.

दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, धारधार शस्त्रांनी तिघांची हत्या करण्यात आली होती. मसलकर यांची अधिक चौकशी केल्यानंतर विवाहबाह्य संबंधातून हे हत्याकांड केल्याचे पुढे आले आहे.

First Published: Saturday, October 6, 2012, 09:32


comments powered by Disqus