पैशासाठी मुलाने घोटला आईचा गळा son murders his mother for money

पैशासाठी मुलाने घोटला आईचा गळा

पैशासाठी मुलाने घोटला आईचा गळा
रवींद्र कांबळे, www.24taas.com, सांगली

सांगलीमध्ये पैशासाठी मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. दोन दिवसांपूर्वी मुलगा रुपेश पाटीलनं आपल्या आईचा खून केला होता. परंतु रुपेश पाटीलनं या घटनेला दरोड्याचे स्वरूप देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य छडा लावत मुलाला अटक केली असून सूनही संशयाच्या भोव-यात सापडलीय.

होही धक्कादायक घटना सांगलीतल्या पत्रकार नगरजवळच्या साईनाथ अपार्टमेंटमध्ये घडली. नराधम रुपेश पाटीलनं पैशासाठी आपली आई विजया पाटील( फोटो वापरणे) हिचा गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणात रुपेशची पत्नीही संशयाच्या भोव-यात सापडलीय. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असून आरोपी रुपेश पाटीलनं सुरुवातीला या घटनेला दरोड्याचं स्वरूप देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला असून घरातून पस्तीस हजारांची रोकड आणि सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची फिर्याद त्यानं पोलिसांत दिली होती. परंतु सांगली पोलिसांनी कसून तपास करत रुपेशनेच दरोड्याचा बनाव रचून आईचा खून केल्याचं उघड केलं.

आईच्या हत्या प्रकरणात मुलगा रुपेश बरोबरच सून शुभांगी पाटीलही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळं मुलगा आणि सुनेनं संगनमतानं डाव रचून आईचा काटा काढल्याची शक्यता वर्तवण्यात येतंय. परंतु मुलानंच आईला पैशासाठी संपवल्यानं माय-लेकाच्या त्या प्रेमळ नात्यालाही कलंक लागलाय. एवढं मात्र नक्की.

First Published: Monday, December 10, 2012, 18:48


comments powered by Disqus