मूक-बधीर मुलांना समजून घेण्यासाठी `अॅप`ची मदत, special app for understand Deaf-mute child

मूक-बधीर मुलांना समजून घेण्यासाठी `अॅप`ची मदत...

मूक-बधीर मुलांना समजून घेण्यासाठी `अॅप`ची मदत...
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

मूक-बधीर मुलांना इतरांशीही सहज संवाद साधता यावा, यासाठी पुण्यातल्या इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी साईन लॅग्वेज ‘ऑडिओ’मध्ये कन्व्हर्ट करण्याचं एक अॅप विकसीत केलंय. या अॅपमुळे साईन लँग्वेज येत नसलेल्यांनाही मूकबधिरांशी संभाषण करता येणार आहे आणि तेही मोबाईलच्या माध्यमातून...

मूक-बधीर विद्यार्थी साईन लॅंग्वेजच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू शकतात. मात्र बऱ्याच वेळा त्यांना काय म्हणायचंय हे इतरांना कळत नाही. हीच अडचण ओळखून पुण्यातल्या व्हीआयटी कॉलेजमध्ये शिकण्याऱ्या विद्यार्थ्यांनी यावर तोडगा काढत एक अॅप विकसीत केलंय. या अॅपमध्ये साईन लॅंग्वेजचा की-बोर्ड तयार करण्यात आलाय.

या की बोर्डवर टाईप केलेला मजकूर ‘ऑडिओ’मध्ये कन्व्हर्ट होतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचंय, ते कळतं... तसंच अगदी याच्या उलट म्हणजे एखाद्या ऑडिओ क्लिपचं रुपांतर साईन लँग्वेजही करता येऊ शकतं, अशी माहिती शुभांगी यरोलकर, सायली बोरा या विद्यार्थीनींनी दिलीय.

हे अॅप विकसीत करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी वर्षभर बिबवेवाडीतल्या आधार मूकबधिर विद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या भाषेचा अभ्यास केला. याच, क्षेत्रात आणखी कुठल्या सुविधा उपलब्ध करुन देता येतील, त्यावर या टीमचं संशोधन सुरू आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 14:38


comments powered by Disqus