एसटी पुलावरून कोसळून ३ ठार, ३८ जखमी, ST accidents in Satara

एसटी पुलावरून कोसळून ३ ठार, ३८ जखमी

एसटी पुलावरून कोसळून ३ ठार, ३८ जखमी
www.24taas.com, झी मीडिया,सातारा

सातारा जिल्ह्यातील वर्धनगड घाटात आज एसटी कोसळून झालेल्या अपघातात तीन ठार तर ३८ प्रवासी जखमी झालेत. ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

दहिवडी डेपोची दहिवडी – सातारा या एसटीला हा अपघात झाला आहे. सातारा – सोलापूर राज्य मार्गावर कोरेगावपासून ७ किलोमीटर अंतरावर वर्धनगड घाट आहे. बस याठिकाणी आली असता चालकाचा ताबा सुटल्याने एसटी पुलावरून १५० फूट कोसळली. जखमींना सातारा शासकीय रुग्ण्यालात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


फोटोफीचर सातारा एसटी अपघात



First Published: Friday, August 23, 2013, 15:28


comments powered by Disqus