जयप्रभा स्टुडिओ विक्रीस सध्या स्थगिती stay on Jayprabha studio sell

जयप्रभा स्टुडिओ विक्रीस सध्या स्थगिती

जयप्रभा स्टुडिओ विक्रीस सध्या स्थगिती

www.24taas.com, कोल्हापूर

जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा वाद कोर्टात गेल्यावर दिवाणी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत विक्रीची कोणतीही प्रक्रिया करू नये ,` असा आदेश दिला आहे. न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी सोमवारी आदेश दिला. या आदेशामुळे लता मंगेशकर यांना जयप्रभा स्टुडियो सध्यातरी विकता येणार नाही.

`जयप्रभा स्टुडिओ संपूर्ण कोल्हापुरासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे ही जागा विकली जाऊ नये, यासाठी गेल्या आठवडाभरापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुढाकाराने आंदोलन सुरू आहे. जयप्रभा स्टुडिओचा वापर केवळ चित्रपट निर्मितीसाठीच करावा , अशी अट संस्थानकालीन मूळ करारात समाविष्ट होती. त्यामुळे स्टुडिओच्या विक्री विरोधात महामंडळाच्या वतीने लता मंगेशकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली होती. या संदर्भात शुक्रवारी महामंडळाने कोल्हापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता.

लता मंगेशकर यांच्यावतीने अॅड. महादेवराव आडगुळे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने वकील प्रकाश मोरे यांनी काम पाहिले. मंगेशकर यांच्यावतीने अॅड. आडगुळे यांनी मुदत मागून घेतल्याने पुढील सुनावणीपर्यंत जयप्रभाबाबत कोणताही व्यवहार करण्यास न्यायालयाने मनाई आदेश दिला.

First Published: Tuesday, September 4, 2012, 16:50


comments powered by Disqus