Last Updated: Friday, February 14, 2014, 12:28
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरस्ट्राबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर. पण आता महाबळेश्वरमध्ये मिळणारी उत्कृष्ठ दर्जाची स्ट्राबेरी कोल्हापुरात सुद्धा पिकतेय. ऐकूण चकीत झालात ना. होय पण हे खरं आहे.. कोल्हापूर जिल्हयातील वडणगेमधल्या प्रयोगशील शेतक-यानं आपल्या शेतात चक्क स्ट्राबेरीचं पिक घ्यायला सुरवात केलीय.
उसाचा पट्टा म्हणून कोल्हापूर जिल्हयाची ओळख.जिल्हयात अनेक साखर कारखान्याबरोबर गु-हाळघर असल्यामुळं इथाला शेतकरी उस शेती करणं पसंत करतो. पण गेल्या काही वर्षापासुन इथल्या काही शेतक-याची मानसीकता बदललीय आहे, कोल्हापूर जिल्हयातील वडगणेचे प्रगतशील शेतकरी शिवाजी पवार. हे यापैकीच एक. उस शेती आणि भाजीपाला शेतीतून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नसल्याचं पाहुन त्यांनी स्ट्राबेरी शेतीचा प्रयोग करण्याचं ठरवलं.
शिवाजी पवार यांनी आपल्या २० गुंठे शेतीत स्ट्राबेरी पिकाची लागवड केलीय...त्यासाठी त्यांना आतापर्यत सव्वा ते दिड लाख रुपये खर्च आलाय.यातुन आतापर्यत त्यांना अडीच ते तीन लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. या शेतीचा प्रयोग करण्याआगोदर त्यांनी महाबळेश्वर,पाचगणी आणि रहिमतपुर इथं जावुन तिथलं तापमान, मातीतील घटक यांचा सखोल अभ्यास केला, आणि त्यानंतरच स्ट्राबेरीची शेती करण्याचं ठरवलं. त्यांच्याया प्रयोगाला चांगलं यश मिळालंय.
शिवाजी पवार यांनी स्ट्राबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर त्याचा हा प्रयोग पहाण्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील अनेक उस आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी भेट देतायत. उस दारासाठी रस्त्यांवर उतरणा-या शेतक-यांना स्ट्राबेरी शेतीच्या निमीत्तानं नवा पर्याय उभा राहिलाय असच म्हणावं लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 12:28