छेडछाडीमुळे कॉलेजच्या तरुणीची आत्महत्या?, Student in Hostel commits suicide

छेडछाडीमुळे कॉलेजच्या तरुणीची आत्महत्या?

छेडछाडीमुळे कॉलेजच्या तरुणीची आत्महत्या?
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमधल्या डी वाय पाटील कॉलेजच्या एका तरुणीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. स्नेहा दिलीप गवई असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती बीबीए अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षाला होती. तिचं वय २२ वर्षं होतं.

स्नेहानं सकाळच्या सुमारास कॉलेजच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जाऊन उडी घेतली. तिच्या आत्म्हत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही. मात्र ठोस कारण अजून समजलं नसल तरी छेड छाडीला कंटाळून तीन आत्महत्या केल्याची चर्चा आहे. नेहा ही मूळची नागपूरची असून सध्या ती कॉलेजच्या वसतीगृहात राहत होती. शुक्रवारी सकाळी तिने वसतीगृहाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येच्या कारणांचा पोलीस तपास करत आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, October 25, 2013, 19:20


comments powered by Disqus