सजग, विवेकी, निर्भय होवू!- विद्यार्थ्यांची मोहीम Students vow to take Dabholkar`s message forward

सजग, विवेकी, निर्भय होवू!- विद्यार्थ्यांची मोहीम

सजग, विवेकी, निर्भय होवू!- विद्यार्थ्यांची मोहीम
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातल्या विविध कॉलेजचे ४० विद्यार्थी एकत्र येऊन सजग, विवेकी, निर्भय होवू! ही मोहीम एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलीय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली देत अंधश्रद्धेविरुद्ध समाजाला जागरुक करण्यासाठी हे ४० विद्यार्थी पुढं आले आहेत.

अंधश्रद्धेविरोधात माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या एसपी कॉलेजमध्ये तीन दिवसीय सेमिनारचं आयोजन केलंय. या सेमिनारमध्ये भोंदूबाबा दाखवत असलेल्या विविध चमत्कारांचं वैज्ञानिक कारण समजावून सांगणार आहेत.

श्रेनिक लोढा हा बी. जे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी म्हणतो, “एसपी कॉलेजच्या २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या सेमिनारमध्ये सहभाग घेतला असून आम्ही चमत्कारांमागचं वैज्ञानिक सत्य आणि भोंदूबाबा नागरिकांना कसं फसवतात, याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहोत.आम्हाला समाजाला अंधश्रद्धआ मुक्त करायचंय.”

तर आकाश सावंत हा वाडिया कॉलेजचा विद्यार्थी म्हणतो, आम्ही पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, अभिनव कॉलेज आणि रानडे इन्स्टिट्यूट या सर्व कॉलेजमध्येही सेमिनार घ्यायचा विचार करतोय. जर आमच्या या मोहिमेला कोणी विरोध केला, तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावरही उतरु”. (डीएनए)



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013, 12:57


comments powered by Disqus