Last Updated: Wednesday, November 14, 2012, 17:45
www.24taas.com, कोल्हापूरऊसदर आंदोलनामुळं पश्चिम महाराष्ट्रात सकाळी सुरु करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. आंदोलनामुळं सांगली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. सांगली-इस्लामपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
त्यामुळं एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको सुरु आहे. त्यामुळं तिथली एसटी सेवाही बंद ठेवलीये. वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासाठी रस्त्यावर झाडं तोडून टाकण्यात आलीयेत. त्यामुळं वाहतूक ठप्प झालीये. दोन दिवस एसटी बंद ठेवल्यानंतर सकाळी ती सुरु करण्यात आली होती. मात्र पुन्हा आंदोलन झाल्यानं एसटी सेवा बंद करण्यात आलीये. तर सांगलीतल्या पेठ-शिराळा रस्त्यावर शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.
रेठरे धरण गावाजवळ आंदोलकांनी टायर पेटवले.. त्यामुळं इथली वाहतूक ठप्प झालीय. रेठरे धरणपासून तीन किलोमीटरवर असणा-या सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर गावाकडं जाणा-या रस्त्यावरही शेतक-यांनी रास्ता रोको करत रेठरेधरण कडून चिकुर्डेकडं जाणारी वाहतूक रोखून धरली.
First Published: Wednesday, November 14, 2012, 17:45