ऊसाला २५०० रूपये भाव , sugarcane andolan,sugarcane

ऊसाला २५०० रूपये भाव

ऊसाला २५०० रूपये भाव
www.24taas.com, सांगली

सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केला असून, उसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.

अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये बैठक झाली. यात सहकारी, खाजगी आणि बहुराज्य कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऊसाला प्रतिटन २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

अर्थमंत्र्यांना हा निर्णय मान्य असेल आणि यामुळे शेतक-यांचा रक्तपात थांबणार असेल, तर आपल्यालाही हा निर्णय मंजूर असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलंय.

शेतकरी संघटनेची ३०००रुपयांचा हप्ता देण्याची मागणी होती. मात्र अडीच हजारांवर तोडगा निघाल्यानं एका शेतक-याचा बळी घेणारं आणि अनेकांना जखमी करणारं हे आंदोलन शांत झालंय.. मात्र ऊसदराच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरकारला लवकरच पावलं उचलावी लागतील, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

First Published: Monday, November 19, 2012, 15:36


comments powered by Disqus