Last Updated: Monday, April 21, 2014, 14:56
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरातील आयआरबी टोलवसुलीला अखेर तात्पुरती स्थगित मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे.
आयआरबी कंपनी विरोधात उच्च न्यायालयात या बाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने टोलविरोधी कृती समितीला रस्त्यांबाबत आढावा घेऊन प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे
कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी टोलधाडीतून मुक्तता करण्याची घोषणा केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचं कारण पुढे आलं, आणि टोलमुक्तीची घोषणा हवेतच विरली.
राज्य सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. मात्र या समितीचं अद्याप कोल्हापूरकरांना दर्शन झालेलं नाही.
प्रकल्पाचे मूल्यांकन, अपूर्ण आणि दर्जाहीन कामे यांची प्रत्यक्ष पाहणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या तरी कोल्हापूरकरांना दिला मिळाला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 21, 2014, 14:56