सुप्रिया सुळेंची धावपळ... तिसुद्धा राज ठाकरेंसाठी?, Supriya Sule meet to Raj Thackeray

सुप्रिया सुळेंची धावपळ... तीसुद्धा राज ठाकरेंसाठी?

सुप्रिया सुळेंची धावपळ... तीसुद्धा राज ठाकरेंसाठी?
www.24taas.com, पुणे

`ओ हॅलो.. हॅलो... हॅलो तुमच्या सिक्युरिटीला जरा मागे करून निघाले....` असं म्हणत सुप्रिया सुळे या राज ठाकरेंसाठी धावपळ करत पढे आल्याचे या शाही लग्नात दिसून आलं... आणि त्यांच्या या वक्तव्यावर राज ठाकरे हे देखील चांगलेच दिलखुलास हसताना दिसून आले.

पुण्यात रंगलेल्या शाही सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. राज ठाकरे यांचे आगमन होताच त्यांच्याभोवती नेहमीप्रमाणे गर्दीचं कोडाळं झालं होतं. त्यामुळे प्रत्येकांनी आवर्जुन राज ठाकरे यांची भेट घेत होते. मात्र या लग्नात सर्वात जास्त धावपळ सुरू होती ती म्हणजे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची... ठाकरे आणि पवार यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे राज ठाकरेंना पाहून सुप्रिया सुळे अगदी धावपळत पुढे आल्या आणि जाता जाता का होईना राज ठाकरे यांची ओझरती भेट त्यांनी आवर्जुन घेतली.

पुण्यात काल शाही विवाह सोहळा रंगला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. वनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी कन्या यांचा राजेशाही थाटात विवाह झाला.

First Published: Saturday, December 8, 2012, 17:10


comments powered by Disqus