वीजचोरी प्रकरणी भाजप आमदाराला 3 वर्ष सक्तमजुरी, suresh halvankar in jail for 3 years

वीजचोरी प्रकरणी भाजप आमदाराला 3 वर्ष सक्तमजुरी

वीजचोरी प्रकरणी भाजप आमदाराला 3 वर्ष सक्तमजुरी

www.24taas.com, झी मीडिया, इचलकरंजी

इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळवणकर आणि त्याचे भाऊ महादेव हळवणकर यांना वीज चोरी केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय.

भाजप आमदार सुरेश हळवणकर आणि त्यांचे बंधू महादेव हळवणकर यांनी गणेश यंत्रमाग उद्योग समूहासाठी वीज मिटरमध्ये फेरफार करुन वीस लाखाची फसवणूक केली होती. त्यानंतर वीज मंडळान इलेक्ट्रिसिटी अॅक्ट 2003 प्रमाणे कलम 135 आणि 138 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

आज या प्रकरणी सुनावणी करत असताना इचलकंरजी जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एस.शहापुरे यांनी हळवणकर आणि त्यांचे बंधु महादेव हळवणकर यांना तीन वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.

दरम्यान 25 हजार रुपयांच्या जामीनावर आमदार सुरेश हळवणकर आणि त्याचे भाऊ महादेव हळवणकर यांची कोर्टानं मुक्तता केलीय.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 3, 2014, 22:29


comments powered by Disqus