तब्बल १३ वर्षांनी कलमाडींनी चाखली पराभवाची चव!, Suresh Kalmadi loses AAA re-election, Al-Hamad new president

तब्बल १३ वर्षांनी कलमाडींनी चाखली पराभवाची चव!

तब्बल १३ वर्षांनी कलमाडींनी चाखली पराभवाची चव!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जेलची वारी केलेल्या सुरेश कलमाडी यांच्या क्रीडाविश्वातील अस्तित्वाला धक्का बसलाय. पुण्यात झालेल्या ‘एशियन अॅथलेटिक्स असोसिएशन’च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोर जावं लागलंय.

कतारच्या दहलान जुमान अल हमाद यांनी कलमाडी यांचा २०-१८ ने पराभव केला तर ७ मतं बाद झाली. अल हमाद हे अशियन अॅथलेटिक असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. या पराभवामुळे कलामाडी यांची ‘एशियन अॅथलेटिक्स असोसिएशन’वरील १३ वर्षांची राजवट समाप्त झालीय. या निवडणूकीद्वारे क्रीडाविश्वातील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. मात्र हमाद सारखे प्रतीस्पर्धी आणि भ्रष्टाचाराचे आरोप यांच्यामुळे कलमाडी यांना पराभूत व्हावं लागलं. या पराभवामुळे कलमाडी यांचं क्रीडा विश्वातील १३ वर्षांचं करियर संपुष्टात आलंय.

कॉमन वेल्थ स्पर्धांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असताना सुरेश कलमाडी पुन्हा एकदा `एशियन अॅथलेटिक असोसिएशन`च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले होते. कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना ही निवडणूक कशी लढता येणार असं विचारलं असता, कलमाडी यांच्यावर फक्त आरोप झालेत ते सिद्ध झाले नाहीत, असं उत्तर ‘अशियन अॅथलेटिक असोसिएशन’चे सचिव मॉरीस निकोलस यांनी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 1, 2013, 13:58


comments powered by Disqus