कलमाडींच्या फोटोंवरुन पुण्यात सुरू मानकरांचं राजकारणsuresh kalmadi vs dipak mankar, pune

कलमाडींच्या फोटोंवरुन पुण्यात सुरू मानकरांचं राजकारण

कलमाडींच्या फोटोंवरुन पुण्यात सुरू मानकरांचं राजकारण
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

सुरेश कलमाडींच्या महापालिकेतल्या फोटोंवरुन दीपक मानकरांनी राजकारणाला सुरुवात केल्याबरोबरच हा वाद मिटवण्याचा प्रयत्न पक्षानं केलाय. काल रात्री महापालिकेचं पक्ष कार्यालय आणि उपमहापौरांच्या दालनातून कलमाडींचे फोटो हटवण्यात आलेत.

राष्ट्रकुल घोटाळ्यानंतर कलमाडींना निलंबित करण्यात आलं असलं तरी, कलमाडींचं पुणे काँग्रेसमधील वर्चस्व जगजाहिर होतं. अगदी परवा-परवा झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणूकीतही कलमाडींचे कट्टर समर्थक बंडू गायकवाड यांची वर्णी लागली होती.

नुकत्याच झालेल्या चार राज्यांतल्या निवडणुकांमधे आलेली काँग्रेसविरोधी लाट आणि कलमाडींच्या पक्षांर्तगत विरोधकांनी डोकं वर काढल्यानं पक्षाच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता होती. ते ओळखत पक्षानं हे पाऊल उचलल्याचं दिसतंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 21:31


comments powered by Disqus