Last Updated: Monday, March 24, 2014, 23:31
www.24taas.com, झी मीडिया, भोसरीअकरावीत शिकणाऱ्या, १७ वर्षीय रश्मी अप्पासाहेब देशपांडे, राहणार रामनगर, भोसरी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी व तिची बहीण राहत्या घरात झोपल्या होत्या. त्यामुळे तिची आई भाजी आणण्यासाठी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घराला बाहेरून कडी लावून गेली होती.
काही वेळाने ती घरी आल्यावर रश्मीने गळफास घेतल्याचे आढळून आले. तसेच तिचे पाय जमिनीला टेकत होते. त्यामुळे रश्मीच्या आईने तिला प्रथम पाणी देऊन, संततुकारामनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
तेथून साडे सात-आठच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी रश्मीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 24, 2014, 23:31