महालक्ष्मीचा प्रसाद महिला बचत गटाचाच Tender of Prasad to Mahalakshmi

महालक्ष्मीचा प्रसाद महिला बचत गटाचाच

महालक्ष्मीचा प्रसाद महिला बचत गटाचाच
www.24taas.com, कोल्हापूर

कोल्हापूरच्या महालक्ष्मी प्रसादाच्या वादावर पडदा पडलाय. प्रसादाचं कंत्राट महिला बचत गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच प्रसादासाठी लाडूच दिले जातील, असंही निश्चित झालंय. झी 24 तासनं सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतर सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निर्णय घेणं भाग पडलंय.

देवस्थान समिती आणि जिल्हाअधिकाऱ्य़ांची आज बैठक झाली. यावेळी प्रसादाला लाडू देण्याचं तसंच कंत्रात महिला बचत गटाला देण्याचा निर्णय झालाय. महालक्ष्मी भक्तांच्या नजराही या बैठकीकडं लागून राहील्या होत्या.

दरम्यान, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा गाभारा आज संध्याकाळी साडेसहावाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या कामासाठी गाभारा बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळं देवीच्या मुळ मुर्तीचं भक्तांना दर्शन करता येणार नाही. नवरात्रोत्सवापूर्वी दरवर्षी मंदिर आणि गाभा-याची स्वच्छता-रंगरंगोटी करण्यात येते. मूळ मूर्तीचं भक्तांना दर्शन करता येणार नसलं, तरी भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणुन देवीची उत्सवमूर्ती सरस्वती देवीच्या गाभा-यात ठेवली जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता आंबाबाईची सालंकृत पुजा करण्यात येईल व गाभारा खुला होईल.

First Published: Wednesday, October 10, 2012, 16:27


comments powered by Disqus