Last Updated: Monday, May 14, 2012, 11:29
www.24taas.com, सांगली 
सांगली जिल्ह्यातल्या जतमधील प्रशासकीय इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सतप्त आंदोलकांनी मध्यरात्री उपनिबंधक आणि विवाह नोंदणीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला.
मात्र या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. शिवसेनेनं या घटनेची जबाबदारी घेतली आहे. दुष्काळ जाहीर करा अथवा आक्रमक आंदोलन करू असा इशारा शिवसेनेनं काही दिवसांपूर्वी दिला होता.
दुष्काळग्रस्तांना योग्य अशी मदत सरकारकडून मिळत नसल्याने आता त्याविरोधात विरोधक जास्तच आक्रमक होत चालले आहेत. त्यामुळे यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सेनेने दिला आहे.
First Published: Monday, May 14, 2012, 11:29