सुहास पळशीकरांच्या हल्लेखोरांना अटक - Marathi News 24taas.com

सुहास पळशीकरांच्या हल्लेखोरांना अटक

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात डॉक्टर सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी चौघांना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्टूनप्रकरणी सुहास पळशीकर यांच्या पुणे विद्यापीठातल्या कार्यालयावर शनिवारी काहींनी हल्ला केला होता.
 
रिपब्लिकन पँथरनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्याप्रकरणी राहुल खंदारे, सुभाष तेलगुते, बालाजी गायकवाड आणि सागर गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता कोर्टानं १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
सीबीएसईच्या 11 वीच्या पुस्तकात आंबेडकरांच्या कार्टुनवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला होता. मायावतींसहित इतर पक्षांच्या नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता.
 
 
 

First Published: Monday, May 14, 2012, 16:50


comments powered by Disqus