नऊ महिन्यांनंतर पुणे विद्यापीठाला कुलगुरू! - Marathi News 24taas.com

नऊ महिन्यांनंतर पुणे विद्यापीठाला कुलगुरू!

www.24taas.com, पुणे
डॉ. वासुदेव गाडे यांची पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून नियुक्ती झालीय. त्यामुळे तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुणे विद्यापीठाला कुलगुरू मिळालेत.... डॉ. शेवगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर गेले नऊ महिने पुणे विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरुंच्या हाती होता....
 
 
आज कुलपती आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी डॉक्टर गाडे यांच्या नियुक्तीची घोषणा करून कुलगुरूपदाची प्रतीक्षा संपवली.... देशभरातून आलेल्या 19 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांची नावं शोध समितीनं कुलपतींकडे पाठवली होती... त्यातून डॉक्टर गाडेंची निवड झालीय...
 
 
अलिकडच्या काळात पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही.... याआधी हे विद्यापीठ स्टेपिंग स्टोन म्हणून पाहिलं जात होतं.... या पार्श्वभूमीवर डॉक्टर गाडे यांच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असेल.... नागपूर विद्यापीठातून बीएस्ससी झालेल्या डॉक्टर गाडे यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमएस्ससी, एमफिल आणि पीचडी अशा पदव्या मिळवल्यात....
 
 
फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्षे ते पोस्ट डॉक्टोरल फेलो होते.... दिल्लीत सीएसआयआरमध्ये 20 वर्षे वैज्ञानिक म्हणून सेवा केल्यानंतर जुलै 2003 पासून ते पुणे विद्यापीठात रिडर आणि प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. सध्या ते बोर्ड ऑफ कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे डायरेक्टर आहेत....
 

First Published: Tuesday, May 15, 2012, 21:24


comments powered by Disqus