Last Updated: Tuesday, May 15, 2012, 21:33
www.24taas.com, पुणेअमरावतीचे विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांच्या मुलाच्या पुण्यातील घरावर सीबीआयनं छापे टाकलेत. परेश ठाकूर असं विभागीय आयुक्तांच्या मुलाचं नाव आहे.
परेशच्या कोथरुडमधल्या घरावर छापा टाकण्यात आलाय. सीबीआयनं परेश विरोधात गुन्हा नोंदवला असून त्याचं घरही सील केलंय. भारत सरकारचे खोटे सरकारी शिक्के, लेटर हेड आणि व्हिजिटिंग कार्डस छापून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप परेशवर आहे.
परेशनं कृषी विकास शिल्प केंद्र नावाची संस्था काढली होती. ही संस्था भारत सरकारच्या अखत्यारित असल्याचं परेश लोकांना सांगायचा. आणि सरकारी नोकरी तसंच कर्ज देतो असं सांगून त्यानं फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
First Published: Tuesday, May 15, 2012, 21:33