Last Updated: Friday, May 25, 2012, 10:05
www.24taas.com, सातारा साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांना काँग्रेसनं पक्षात येण्याची ऑफर दिलीये. केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांनी एका खासगी कार्यक्रमात उदयनराजेंसमोर काँग्रेसप्रवेशाचा प्रस्ताव ठेवलाय.काँग्रेसमध्ये आल्यास लोकसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासनही त्यांना देण्यात आलंय. शिवसेनेचे माजी आमदार शंभूराजे देसाईंसमोरही काँग्रेसमध्ये येण्य़ाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.
या प्रस्तावावर उदयनराजे भोसले यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘वेळ आल्यावर आपण प्रस्तावाचा विचार करु’ असं उदयनराजेंनी म्हटलंय.
First Published: Friday, May 25, 2012, 10:05