Last Updated: Saturday, May 26, 2012, 09:55
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती कोल्हापूरात दाखल झाली आहे. रस्त्याची पाहणी करण्यापूर्वी टोलविरोधी कृती समितीने आपली मतं या समितीपुढे मांडली.
रस्त्यांची वाढलेली उंची, सांडपाण्याची पाईपलाईन बदलणे, कामाचा दर्जा कसा आहे याबाबत काटेकोर तपासणी याबाबत समितीने तज्ज्ञांसमोर मतं मांडली. मात्र कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही अशी ठाम भूमिका कृती समितीने मांडलीय. कोल्हापूर शहरात गेले अडीच वर्षांपासून रस्त्यांच काम सुरु आहे. आता हे काम पूर्ण झाल्याचं आयआरबीचं म्हणणं आहे.
मात्र रस्त्याच्यामधील सांडपाण्याची पाईपलाईन बाजूला काढली जात नाही तोपर्यंत काम पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही असं टोलविरोधी कृती समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आलीय.
First Published: Saturday, May 26, 2012, 09:55