दोन अपघातांत सात ठार - Marathi News 24taas.com

दोन अपघातांत सात ठार

www.24taas.com, नाशिक
 
पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झालाय. पुण्यात मोरगावजवळ एका खाजही बसनं दोघांना चिरडलय. तर नाशिकमध्ये कळवण तालुक्यातील महाल रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून ५ जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात १० ते १२ जण जखमी झालेत.
 
सप्तश्रुंगी गडावरून दर्शन घेऊन कळवण तालुक्‍यातील मोहोळ येथे परत येत असताना ट्रॅक्‍टर उलटल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला असून १६ जखमी झाले आहेत. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील मोहोळ या गावातील काही रहिवासी काल सप्तश्रुंगी गडावर दर्शनासाठी गेले होते. नवस फेडून काल रात्री कळवण तालुक्‍यातील मोहोळ येथे परत येत असताना चढावावर ट्रॅक्‍टर उलटला. या घटनेत चार जण जागीच ठार झाले तर १६जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

First Published: Saturday, May 26, 2012, 22:15


comments powered by Disqus