अण्णा विठोबाच्या चरणी... - Marathi News 24taas.com

अण्णा विठोबाच्या चरणी...

www.24taas.com, पंढरपूर
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पंढरपुरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार बंद होऊन देशाची प्रगती होऊ दे असं साकडं अण्णांनी विठ्ठलाला घातलं. देशातल्या राजकारण्यांना आणि प्रशासनाला भ्रष्टाचारमुक्तीसाठी चांगलु बुद्धी दे असंही अण्णांनी विठ्ठलाकडं मागणं घातलं.
 
तर टीम अण्णांच्या सदस्यांनी परराष्ट्रीयमंत्री एस एम कृष्णांवर केलेल्या आरोपांनी चांगलीच खळबळ उडाली आहे. टीम अण्णांच्या सदस्यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप केंद्रीय परराष्ट्रीयमंत्री एस एम कृष्णांनी फेटाळले आहेत. टीम अण्णांनी पंतप्रधानांसह १५ केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत.
 
त्यात एस एम कृष्णांचाही समावेश आहे. यासंदर्भात परराष्ट्रमंत्र्यांनी अरविंद केजरीवालांना पत्र पाठवलं आहे. केजरीवालांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात येईल असं एस एम कृष्णांच्या सूत्रांनी सांगितलं.
 
 
 
 

First Published: Sunday, May 27, 2012, 16:27


comments powered by Disqus