Last Updated: Tuesday, May 29, 2012, 12:15
www.24taas.com, पुणे पुण्याचं अभिनव कॉलेज बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हा निर्णय रद्द करण्यात आला असून सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि 'झी 24 तास'ने सातत्यानं हा प्रश्न उचलून धरल्यामुळे कॉलेज बंद करण्याचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे 'झी 24 तास'च्या पाठपुराव्याला एकप्रकारे मिळालेलं हे यश आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं अभिनव महाविद्यालयाची पाषाण रोड शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
व्हिडिओ पाहा.. ‘अभिनव कॉलेज’ बंद होणार नाही स ंबंधित बातमी 
अभिनव कॉलेज होणार बंदपुण्यातलं अभिनव कला महाविद्यालय बंद होणार आहे. आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. सध्या सुट्टी सुरू असली तरी विद्यार्थी कॉलेजमध्ये जमतात.
First Published: Tuesday, May 29, 2012, 12:15