Last Updated: Wednesday, May 30, 2012, 14:02
www.24taas.com, कोल्हापूर 
कोल्हापूरजवळ गोकुळ शिरगावमध्ये अन्वर ऑईल मिलला भीषण आग लागली. या भीषण आगीत ऑईल मिल जळून खाक झाली. पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली होती.
आगीवर नियंत्रण मिळवण्य़ासाठी अग्निशमन दलाच्या ५ बंब गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. मात्र ऑइल असल्याने ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली.
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,मात्र या आगीमुळे ऑइल मिलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अजून तरी या आगी मागचं कारण समजू शकलेलं नाही.
First Published: Wednesday, May 30, 2012, 14:02