पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत संघर्ष निकाराला - Marathi News 24taas.com

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत संघर्ष निकाराला

झी 24 ताससाठी पिंपरी चिंचवडहून कैलास पुरी.......
 
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अजितदादांनी आत्ताच जोरदार मोर्चेबांधणी केलीये. तर हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चिंचवडच्या मैदानात उतरली आहे.
 
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असा सामना पहायला मिळणार आहे. काँग्रेसनं पिंपरी चिंचवडची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर टाकण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजिदादांकडं पिंपरी चिंचवडचं पालकत्व आहे. त्यातच या दोन्ही नेत्यांमध्ये फारसं सख्य नसल्यानं दोघंही निवडणुकीच्या मैदानात एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्न करणार आहेत. त्यातच अजितदादांची उद्धाटन एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे.
 
केंद्राच्या सर्वाधिक योजना पिंपरी चिंचवडमध्ये राबवल्याचं ते आवर्जुन सांगतात.खडकवासल्यात तोंड पोळल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये कोणताही धोका पत्करण्यास अजितदादा तयार नाहीत. त्यामुळंच नागरिकांवर अक्षरक्षः योजनांची खैरात होते आहे.

First Published: Sunday, December 4, 2011, 17:09


comments powered by Disqus