बापानेच केला मुलीवर बलात्कार - Marathi News 24taas.com

बापानेच केला मुलीवर बलात्कार

www.24taas.com, पुणे
 
पिंपरी-चिंचवडमधली गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही. आज पुन्हा दोन गुन्हेगारी घटनांनी पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. ओटा स्कीम भागात एका नराधमानं स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला. तर दुसरीकडे एका सुरक्षारक्षकानं कामगारावर गोळ्या झाडल्या. गेल्या नऊ दिवसातली ही नववी हत्या आहे.
 
पिंपरी चिंचवडच्या ओटा स्कीम मध्ये एका नराधम बापाने आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मानवतेला काळिमा फासणा-या घटनेमुळं पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडालीय. निगडी पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली.
 
दुसरीकड भोसरीमध्येही एका सुरक्षा रक्षकानं कामगाराची गोळ्या घालून हत्या केली. सुरेंद्र चतुर प्रसाद अस या कामगाराचं नाव आहे. मधुरासिंग उर्फ राजसिंग दरोगासिंग भदोरिया यानं क्षुल्लक कारणावरुन कामगारावर गोळ्या झाडल्या. पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या नऊ दिवसातली ही नववी हत्या ठरली. त्यामुळं पिंपरी चिंचवड मधले नागरिक कमालीचे भयभीत झालेत

First Published: Wednesday, May 30, 2012, 20:43


comments powered by Disqus