Last Updated: Monday, December 5, 2011, 03:14
झी २४ तास वेब टीम, सांगली सांगलीमध्ये कामूद ड्रग्ज लिमिटेडवर टाकण्यात आलेल्या छाप्यात ८० लाखांहून अधिक रुपये किमतीचे ८० किलो केटामाईन जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे. याआधीही कामूद ड्रग्ज लिमिटेडवर छापा टाकण्यात आला होता.
केटामाईनचा औषध बनवण्याशिवाय नशा करण्यासाठीही वापर केला जातो. त्यामुळं केटामाईनच्या या साठ्याबाबत माहिती मिळताच केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केलीय. रविवारी रात्रभर ही कारवाई सुरू होती.
First Published: Monday, December 5, 2011, 03:14