लातूरमध्ये हॉटेलियरचा गूढ मृत्यू - Marathi News 24taas.com

लातूरमध्ये हॉटेलियरचा गूढ मृत्यू

झी २४ तास वेब टीम, लातूर
 
लातूरमध्ये हॉटेल व्यावसायिक विजय मणियार यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याची शंका वर्तवण्यात येतेय.
 
लातूर शहराजवळील नांदेड रोडवर हॉटेल व्यावसायिक विजय मणियार यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी घरगुती किंवा प्रॉपर्टीतच्या वादातून मणियार यांनी रॉकेल ओतून आत्महत्या केल्याचा दावा केलाय.
 
पोलिसांनी आत्महत्या झाला असल्याचा दावा केला तरी मणियार यांच्या मृतदेहाशेजारी आढळून आलेल्या प्लास्टिकच्या रॉकेलच्या डब्याला वाफही लागली नसून डब्याचं झाकणही बंद अवस्थेत दिसतंय. त्यामुळं मणियार यांनी आत्महत्या केली की, त्यांचा खून झाला याबाबत शंका उपस्थित झाली आहे.

First Published: Monday, December 5, 2011, 03:55


comments powered by Disqus