वाढदिवस डेक्कन क्वीनचा - Marathi News 24taas.com

वाढदिवस डेक्कन क्वीनचा

www.24taa.com, पुणे
 
वाढदिवस डेक्कन क्वीनचा...पुणे-मुंबईकरांची लाडकी डेक्कन क्वीन आता ८२ वर्षांची झाली आहे. पुणे-मुंबई प्रवास करणा-या चाकरमान्यांशी एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेल्या डेक्कन क्वीनचा आज ८३ वा वाढदिवस.
 
पुणे स्टेशनवर मोठ्या आनंदात आणि उत्साहात डेक्कन क्वीनचं बर्थ डे सेलिब्रेशन करण्यात आलं. आकर्षक सजावटींनी डेक्कन क्वीनला सजवण्यात आलं होतं. महिला प्रवाशांनी गाडीचं औक्षण केलं. आणि केकही कापण्यात आला.
 
पुणे-मुंबईतील प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा डेक्कन क्वी एक अविभाज्य भाग बनलीये. या गाडीशी प्रवाशांचा अनोखा ऋणानुबंध आहे. म्हणूनच आपल्या या लाडक्या क्वीनप्रती शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी तिचा वाढदिवसही तितक्याच शानदारपणे साजरा केला जातो.
 
व्हिडिओ पाहा..
 

First Published: Friday, June 1, 2012, 12:22


comments powered by Disqus