शेट्टी हत्या : प्रताप दीघावकर यांची चौकशी - Marathi News 24taas.com

शेट्टी हत्या : प्रताप दीघावकर यांची चौकशी

www.24taas.com, पुणे
 
पुणे जिल्ह्यात आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणात सीबीआयनं आज तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रताप दीघावकर यांची चौकशी केली.
 
या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही वादग्रस्त असल्यानं दिघावकर यांच्या चौकशीत काय निष्पन्न होतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे.
 
सतीश शेट्टी यांची तळेगाव दाभाडेत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अँडव्होकेट विजय दाभाडे आणि श्याम दाभाडे हे प्रमुख आरोपी आहेत.हे प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतर अजून कुणालाही अटक झालेली नाही.
 
या प्रकरणात तपास अधिकारी भाऊसाहेब आंधळकर, आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर आणि नितीन साबळे यांची पॉलिग्राफी टेस्टही झाली आहे.

First Published: Friday, June 1, 2012, 15:01


comments powered by Disqus