नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा - Marathi News 24taas.com

नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा

www.24taas.com, पुणे
 
नोकरीच्या आमिष दाखवून लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला लोकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हरिदास वाघमारे असे या भामट्याचे नाव आहे. वाघमारेने सुमारे ८० लोकांना लाखोचा गंडा घातलाय. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय..
 
महापलिकेत नोकरी मिळणार या आमिषापोटी अजय पिल्ले यांचे आत्तापर्यंत २ लाख ६० हजार गेलेत. त्यांना हा गंडा घातलाय तो या भामट्या हरिदास वाघमारेने. पिल्ले यांचे फक्त पैसेच गेले नाहीत, तर त्याने त्याच्या 'हातची सिंटेल' या खाजगी कंपनीची नोकरी देखील बहाल केली. याशिवाय त्याने त्याच्या पत्नीचे दागिनेही गहाण ठवले. आता पैसे गेले, हातची नोकरी गेली आणि मोकळ्या हाताने बेरोजगार होऊन भटकतोय.
 
वाघमारेकडून फसवले गेलेले पिल्ले एकटेच नाहीत. आत्तापर्यंत त्याने सुमारे ८० लोकांना फसवल्याचे समोर आलंय. प्रथम वाघमारेने आपल आडनाव जगताप सांगून त्यांच्याशी ओळख ठेवली. एवढंच नव्हे तर त्याने या लोकांना हुबेहूब ओळखपत्र, नियुक्ती पत्र बनवून त्यांना दिली. याशिवाय त्याने पालिकेतील काही अधिकाऱ्यांसमोर त्यांच्या हाताचे ठसे घेतले. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअप देखील केलं. अशा त-हेनं विश्वास संपादन करुन लाखो रुपयांचा गंडा घातला.
 
हरिदास वाघमारेला एप्रिल २०११ मध्ये  याच प्रकरणात जेलची हवा खायला लागली होती. तरी देखील त्याने फसवण्याचा हा धंदा सुरूच ठेवला. अखेर लोकांनीच त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता तरी पोलीस या लोकांना न्याय मिळवून देतील का वाघमारेला मोकाट सोडतील, हे येणारा काळच सांगेल.
 
 

First Published: Friday, June 1, 2012, 22:55


comments powered by Disqus