कोल्हापुरात गर्भपात, डॉक्टर गायब - Marathi News 24taas.com

कोल्हापुरात गर्भपात, डॉक्टर गायब

www.24taas.com, कोल्हापूर
 
बीडमधील डॉ. सुदाम मुंडे यांच्या दवाखान्यात केले जाणारे स्त्री गर्भपात प्रकरण गाजत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातल्या भोगावतीमध्ये एका दवाखान्यातही गर्भपात झाल्याचं उघड झाले आहे.
 
डॉ. प्रभाकर चौगुले यांच्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील एका महिलेचा गर्भपात करण्यात आला आहे. परवानगी नसताना गर्भपात केल्यामुळं आता डॉ. चौगुलेंवर आठवड्याभरात कारवाई करण्यात येणार आहे. दवाखान्याशेजारी कंपाउंडरच्या घरात सोनोग्राफी मशीन आढळून आले असून ते सील करण्यात आले आहे.
 
या कारवाईनंतर दवाखान्यातील रुग्णांना वा-यावर सोडून डॉ. चौगुले गायब झाला आहे. गर्भपात केलेल्या महिलेला सध्या कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या पोटात दोन महिन्यांचा गर्भ होता.

First Published: Saturday, June 2, 2012, 12:57


comments powered by Disqus