देहू नगरीत विठू नामाचा गजर... - Marathi News 24taas.com

देहू नगरीत विठू नामाचा गजर...

 www.24taas.com, देहू
 
आषाढी वारीसाठी तुकोबांच्या पालखीची सध्या तयारी सुरू आहे. त्यामुळं देहूनगरी सध्या वारकऱ्यांनी फुलुन गेली आहे. येत्या १० तारखेला पालखी पंढरपुरकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहूनगरीत सध्या पालखी प्रस्थानाच्या तयारी सुरू आहे.
 
येत्या १० तारखेला तुकोबांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदाही पिंपरी चिंचवडमध्ये पालखीचा मुक्काम आहे. त्यामुळं पिंपरी-चिंचवडकरांना पालखीचं गोल रिंगण पाहण्याची संधी मिळणार आहे.
 
प्रस्थान जसं जवळ येतंय तसं विठ्ठल भक्तांची आतुराताही शिगेला पोहचली आहे. देहू नागरी आतापासूनच भक्तांनी गजबजून गेली आहे. मंदिरात सुरु असलेलं कीर्तन आणि विठू नामाचा गजर यामूळ अवघं वातावरण भक्तिमय झालं आहे. जसजशी प्रस्थानाची वेळ जवळ येईल तशी देहू नगरीत विठ्ठल भक्तींची गर्दी वाढणार आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, June 3, 2012, 18:40


comments powered by Disqus