NCP नेते एकाच मंचावर, आले प्रेमाचे भरते.. - Marathi News 24taas.com

NCP नेते एकाच मंचावर, आले प्रेमाचे भरते..

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसला गटतटानं पोखरलेलं आहे. मात्र योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सगळे नेते एकाच मंचावर आले. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये हे ऐक्य किती दिवस टिकणार अशीच चर्चा होती. माजी शहराध्यक्ष आझम पानसरे, आमदार लक्ष्मण जगताप, अन्ना बनसोडे, विलास लांडे आणि योगेश बहल. एकाच व्यासपीठावर. तेही शरद पवार किंवा अजित पवार व्यासपीठावर नसताना.
 
हे दृश्य पाहून पिंपरी-चिंचवडकरही बुचकळ्यात पडले असतील. कारण या नेत्यांमधलं सख्य  पिंपरी-चिंचवडकरांना चांगलचं माहित आहे. पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी योगेश बहल यांची निवड झाल्यामुळं त्यांच्या सत्कारासाठी सगळेजण एकत्र आले होते.
 
कार्यक्रमात सर्वांनी एकत्र काम करण्याच्या आणाभाकाही घेतल्या. पण त्या पुढे किती काळ टिकतील हे ठामपणे देवही सांगू शकणार नाही. आजपर्यंत या नेत्यांनी एकमेकांना खच्ची करण्यातच आपली ताकद घालवली. निवडणुकीच्या काळात तिकीट वाटपात हे सख्य राहणार का हाच लाखमोलाचा प्रश्न आहे.
 
 
 

First Published: Sunday, June 3, 2012, 23:26


comments powered by Disqus