Last Updated: Monday, June 4, 2012, 19:53
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापूर शहराजवळ एका हॉटेलमधल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. सादळे-मादळे इथं एका रिसॉर्टवर रेव्ह पार्टी सुरु असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ही कारवाई केली.
सहा तरुणींसह २० जणांना पोलिसांनी अटक केली. त्यात उच्चभ्रू वसाहतीतील मुलांचा समावेश आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, मद्यपान आणि शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाढदिवसानिमित्त ही पार्टी सुरु होती. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना जामीन मिळाला. कोल्हापूर शहरात अशा पार्ट्यांचं प्रमाण वाढलंय.
First Published: Monday, June 4, 2012, 19:53