स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे... - Marathi News 24taas.com

स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे...

www.24taas.com, अहमदनगर
 
राज्यात स्त्री भ्रूण हत्येप्रकरणात रोज नवनवीन  प्रकरण उघडकीस येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातल्या जव्हार भंडारी यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन मार्च ११ मध्ये सिल केलेले असतांनाही डाँ.भंडारींनी मशीन मध्ये फेरफार करुन आपला गोरखधंदा सुरुच ठेवला आहे.
 
अशी माहीती आरोग्य विभागाच्या हाती लागली होती. आरोग्य आणि महसुल विभागाने एक पथक तयार करत डाँ.भंडारीकडे एका महीलेला प्रसुती पुर्वी गर्भ लिंग निदान करण्यासाठी  पाठविले त्या साठी डाँक्टरांनी या महिलेकडून २७ हजार रुपये घेतले.
 
गर्भ लिंग निदान करत असतांनाच या पथकाने डाँ.भंडारीच्या रुग्णालयावर धाड टाकत भंडारींवर कार्यवाही करत त्यांना पोलीसांच्या हवाली केले आहे.
 
 
 

First Published: Tuesday, June 5, 2012, 12:56


comments powered by Disqus