Last Updated: Thursday, June 7, 2012, 10:04
www.24taas.com, अहमदनगर 
ढगाळ वातावरणामुळे पुण्या-मुंबईतील खगोल प्रेमीना शुक्राचं अधिक्रमण पाहता आलं नाही. हा दुर्मिळ योग अनुभवण्याची संधी हुकल्यामुळे अनेकांची निराशा झाली.
मात्र पुण्यातील काही खगोल अभ्यासकांनी नगरमध्ये जाऊन हे अधिक्रमण पाहिलं. नगरमध्ये हवामान अनुकूल असल्याने या दुर्मिळ क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी त्यांना मिळाली.
पुन्हा १०५ वर्षांनीच आता हा दुर्मिळ योग येणार असल्यानं नगरमध्ये दूरदूरहून खगोलप्रेमी आले होते. त्यामुळे त्यांना ह्या दुर्मिळ योगाचा आनंद घेता आला. म्हणजे पुण्यात नाही पाहता आलं तरी नगर पाहता आल्याने पुणेकरांचा आनंद गगनात मावेनासा होता.
First Published: Thursday, June 7, 2012, 10:04