पुण्यात बॉम्बस्फोट आरोपीची जेलमध्ये हत्या - Marathi News 24taas.com

पुण्यात बॉम्बस्फोट आरोपीची जेलमध्ये हत्या

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात येरवडा तुरुंगात कैद्याची हत्या करण्यात आली आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद सिद्दीकी याची हत्या करण्यात आली आहे. मोहम्मद सिद्दीकी याची हत्या जेलमध्येच गळा दाबून करण्यात आली आहे.
 
दगडूशेठ गणपतीजवळ बॉम्ब ठेवण्याचा कट असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणी सिद्दीकी तुरुंगात होता. सिद्दीकी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. येरवडा जेलमध्ये त्याची हत्या करण्यात आली आहे. कतिल महोम्मद जफिर सिद्दीकी असं त्याचं नाव आहे.
 
हा सिद्दीकी दिल्ली बॉम्बस्फोटातील देखील आरोपी असण्याची शक्यता होती. सिद्दीकीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. ही हत्या कोणी केली याबाबतची माहिती उघड झालेली नाही.
 
 
 
 

First Published: Friday, June 8, 2012, 13:48


comments powered by Disqus